
नेवासा – येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी ‘नेवाशाची प्राचीन संस्कृती व संत ज्ञानेश्वर मंदिर’ या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता संत ज्ञानेश्वर मंदिर, नेवासा येथे पार पडणार आहे.

या संवादासाठी पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ डॉ. सतिश नाईक, भेंडा येथील जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे तसेच वेदांताचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

नेवाशाच्या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास, संत परंपरा आणि संत ज्ञानेश्वर मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व यावर सखोल चर्चा या वेळी अपेक्षित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना आपल्या वारशाची नव्याने ओळख होण्याची संधी मिळणार आहे.
या विषयात रस असलेल्या सर्व नेवासकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संत ज्ञानेश्वर मंदिर अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







