नेवासा-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यव्यापी परिषद 3 एप्रिल 2026 सिटू भवन येथे तीन सत्राच्या भरगच्च कार्यक्रमाने संपन्न झाली. नाशिक मध्ये खरात भोंदूगिरी प्रकरण महाराष्ट्राला धक्कादायक वेदना देणारे असल्यामुळे ही राज्यव्यापी परिषद कार्यकर्त्या नाशिक मध्ये आयोजित केली होती. समाजासमोर खरे अध्यात्म आणि नैतिक मूल्य मांडण्यासाठी प्रयत्न झाला आज समाजामध्ये अध्यात्माच्या बुरख्याखाली भोंदूगिरी व बुवाबाजी वाढली आहे हे प्रकार रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठाम निर्धार केला. या परिषदेमध्ये जादूटोणाविरोधी कायदा प्रभावीपणे अंमलबजावणी करावी तसेच या कायद्याची व्याप्ती वाढवावी हा कायदा देश पातळीवर लागू करावा तसेच सर्व नेते व शासकीय पदाधिकारी यांना कायद्याअंतर्गत आचारसंहिता लागू करावी भोंदूगिरी व बुवाबाजी या विरोधात नवीन पिढीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करावा असे ठराव मंजूर करण्यात आले

कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती वंदना शिंदे यांनी लोकगीते सादर केल प्रास्ताविक कृष्णा चांदवडे यांनी केले महाराष्ट्रामध्ये विज्ञाननिष्ठा वाढविण्याचे पुन्हा आव्हान निर्माण झाल्याचे वातावरण आहे त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कामाची गांभीर्य नव्याने उपाययोजना करून वाढवावे लागेल असे विचार मंथन झाले उद्घाटक व प्रमुख पाहुणे कॉम्रेड कराड यांनी माणसे व समाज आपण बाहेरून बदलला पाहिजे असे प्रतिपादन केले दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर नितीन शिंदे यांनी तारे ग्रह आणि नक्षत्र यांची शास्त्रीय माहिती सादर करून फलज्योतिष शास्त्र निराधार असल्याचे प्रतिपादन केले

तिसरा सत्रामध्ये असिस्टंट कमिशनर पोलीस बाबासाहेब बुधवंत व एडवोकेट रंजना रवांदे यांचे बुवाबाजी व कायदा यासंदर्भात विचार मांडले राज्य परिषदेला माधव बावगे संजय बनसोडे डॉ ठकसेन गोराणे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक ढगे भारतीय जनसंसद चे प्रदेश अध्यक्ष अशोक सब्बन, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे व महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी थोर विचारवंत उत्तमराव कांबळे यांनी अत्यंत प्रभावशाली विवेचन करून कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य वाढवावे कारण ती काळाची गरज आहे अशी प्रतिपादित केले नाशिक शहरांमध्ये भव्य पदयात्रा काढून व विविध घोषणा देऊन परिषदेचा समारोप झाला


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






