आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पोलीस

नेवासा -या बातमीतील हकीगत अशी की, टोळी प्रमुख (1) शुभम विश्वास उर्फ विश्वनाथ गर्जे, वय 29 वर्षे, रा. वडुले,ता. नेवासा, जि.अहिल्यानगर. टोळी सदस्य (2) आकाश उर्फ दत्तात्रय मच्छिंद्र सावंत,वय 25 वर्षे, रा. चिलेखणवाडी,ता. नेवासा, जि.अहिल्यानगर व टोळी सदस्य (3) योगेश मच्छिंद्र सावंत, वय 28 वर्षे यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करुन त्यांचे टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकविण्यासाठी नेवासा तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशत निरतंर राहण्याकरीता गैर कायदयाची मंडळी जमवुन गंभीर दुखापत करणे, अश्लील कृती करुन शिवीगाळ दमदाटी करणे, दरोडा टाकणे, अग्नीशस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, साथीचे रोग पसरविणे, गुंगीकारक पदार्थांची विक्री करणे, अग्नीशस्त्र व घातक शस्त्रासह गैर कायदयाची मंडळी जमवुन शिवीगाळ दमदाटी करुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे असे सराईतपणे 09 गुन्हे केलेले असुन दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी व गुन्हेगारीवृत्ती वाढतच चालली होती.

पोलीस


टोळी प्रमुख व टोळी सदस्यांनी सन 2020 ते सन 2025 या कालावधी मध्ये सराईतपणे गुन्हे केले असुन त्यांच्याविरुध्द प्रतिबंध कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. टोळीच्या या कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशतीचे व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्हयांबाबत कोणीही सर्वसामान्य नागरीक उघडपणे तक्रार, साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते. सदर टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडणार असल्याने संपुर्ण टोळीची पांगापांग करुन हद्दपार केल्याशिवाय टोळीचे गैरकृत्यांना आळा बसणार नव्हता.

पोलीस

तसेच नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत व आजुबाजुच्या परिसरातील सर्वसामान्य नागरीकांच्या जिवीतास व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी व टोळीची दहशत कमी करण्यासाठी टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांचे विरुध्द श्री.महेश पाटील, पोलीस निरीक्षक, नेवासा पोलीस स्टेशन यांनी जिल्हा हद्दीतुन 02 वर्षाकरीता हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकण यांचेकडे सादर केला होता.
सदर प्रस्तावाची सखोल चौकशी करुन टोळी प्रमुख (1) शुभम विश्वास उर्फ विश्वनाथ गर्जे,टोळी सदस्य (2) आकाश उर्फ दत्तात्रय मच्छिंद्र सावंत,वय 25 वर्षे व टोळी सदस्य (3) योगेश मच्छिंद्र सावंत, वय 28 वर्षे यांना जिल्हयातुन 03 महिन्याकरीता हद्यपार केले बाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी पारीत केले आहेत.

पोलीस
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!