घोडेगाव – नेवासा तालुक्याचे माजी आ. शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशनच्या हर घर जल योजनेअंतर्गत घोडेगाव पाणी योजनेला मंजूरी मिळाली होती. चार वर्षांपूर्वी म्हणजेच साधारणः 2022 साली या कामासाठी गडाखांच्या प्रयत्नातून तब्बल 48 कोटी 83 लाख रुपये मंजूरही झाले होते. परंतु चार वर्षे उलटूनही घोडेगावकरांना या योजनेचे पाणी मिळालेले नाही. याच अपूर्ण राहिलेल्या तलावात बुडून, गेल्या आठवड्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या गंभीर अपघातानंतर तरी हा तलाव पूर्ण होईल का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

तत्कालीन आ. शंकरराव गडाख यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात ही योजना मंजूर करुन आणली होती. चार वर्षांपूर्वी त्यांच्याच हस्ते या कामाला सुरुवातही झाली होती. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत गडाखांचा पराभव झाल्यावर ही योजना रेंगाळली. शिवाय या योजनेच्या कामातील सामानाची चोरी होण्याचे व खोदलेला मुरुमाची परस्पर विल्हेवाट लावण्याचेही प्रकारही घडले. ही पाणी योजना कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच वादाचे केंद्रबिंदु राहिली. याच अपूर्ण अवस्थेतील कामामुळे गेल्या आठवड्यात या तलावात पडून तीन विद्यार्थी गतप्राण झाले.

या योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने योग्य काळजी घेतली असती आणि सुरक्षा फलक लावले असते तर हा अपघात झाला नसता. शिवाय काम अपूर्ण असताना येथे सुरक्षारक्षही नव्हते. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप आता ग्रामस्थ व मृतांच्या नातेवाईकांकडून होऊ लागला आहे. ही तिन्ही विद्यार्थी हे अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. त्यामुळे या मुलांना शासनाकडून व संबंधीत ठेकेदाराकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
आर्थिक मदत मिळणार का?
चार वर्षांपासून या पाणी योजनेचे काम रेंगाळले आहे. याला सर्वस्वी ठेकेदारच जबाबदार आहे. यात अपूर्ण कामाबाबत ठेकेदाराने कोणतीच काळजी घेतली नाही. येथे सुरक्षारक्षही ठेवलेले नाहीत. त्यामुळे गेल्या आठवड्यात या योजनेच्या तलावात मृत झालेल्या तीन मुलांना ठेकेदाराकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

शासनाचे दुर्लक्ष का?
ही योजना माजीमंत्री शंकरराव गडाख यांच्या कार्यकाळात मंजूर झाली. सध्या नेवाशाचे आमदार हे सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आहेत. राजकीय कुरघोड्यात ही योजना रेंगाळतेय का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. शिवाय आ. विठ्ठलराव लंघे यांनी या मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळवून द्यावी, अशीही मागणी होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






