नेवासा – सत्यशोधक विचारांचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले – फातिमा शेख सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी मानवंदना दिली.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आकाश एरंडे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केला. रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि सतीप्रथेच्या जोखडातून महिलांना मुक्त करून त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्याचे महान कार्य त्यांनी केले.

महात्मा फुले यांच्या कार्यामुळेच आज स्त्रिया शिक्षण, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उच्च पदांवर पोहोचल्या असून देशाच्या राष्ट्रपतीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत महिलांची सशक्त उपस्थिती दिसून येते. याच भावनेतून नगरसेविका सोनाली चव्हाण यांनीही आपल्या मनोगतात महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला डॉ. राहुल चव्हाण, भारत चव्हाण, आनंद चव्हाण, विश्वविनायक मल्टीस्टेट बँकेचे व्यवस्थापक सौरभ दुधे, हर्षल चव्हाण, ओम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर डॉ. राहुल चव्हाण यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






