आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
संत ज्ञानेश्वर

नेवासा बुद्रुक येथे श्री जगदंबा(भोनाई) यात्रेनिमित्त मंदिर प्रांगणात त्रिदिनात्मक धार्मिक सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने युवकांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर ते नेवासा बुद्रुक अशी पायी ज्योत यात्रा काढण्यात आली. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या पारायणाने व धर्म ध्वज पूजनाने शुक्रवारी दि.१० एप्रिल रोजी त्रिदिनात्मक धार्मिक सोहळयास प्रारंभ करण्यात आला.

संत ज्ञानेश्वर


नेवासा बुद्रुक येथे खळवाडी भागात असलेल्या जगदंबादेवी मंदिराच्या प्रांगणात यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक १० एप्रिल ते रविवार दि.१२ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत त्रिदिनात्मक धार्मिक सोहळा साजरा होत आहे.श्री विश्वेश्वर नाथबाबा,श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरीबाबा ,वै.ह.भ.प. बन्सी महाराज तांबे यांच्या कृपाशिर्वादाने तसेच गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज व ह.भ.प. महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक(नेवासेकर) व ह.भ.प. वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के यांच्या प्रेरणेने आणि ह.भ.प. विजय महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या त्रिदिनात्मक धार्मिक सोहळयात रात्री कीर्तनाचे कार्यक्रम देखील होणार आहे.

संत ज्ञानेश्वर


शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत युवकांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर ते श्री जगदंबा माता (भोनाई) मंदिर अशी पायी ज्योत यात्रा काढण्यात आली.नेवासा येथे नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांच्या हस्ते ज्योतीचे पूजन करण्यात आले.
सदरची ज्योत नेवासा बुद्रुक येथील जगदंबा देवीच्या मंदिर प्रांगणात आल्यानंतर काही युवकांनी आणलेल्या कावडीच्या पाण्याने देवीला जलाभिषेक घालण्यात आला.यावेळी पारायण व्यासपीठ चालक विजय महाराज पवार,कोंडीराम महाराज पेचे,नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले तसेच संत श्री गाडगेबाबा भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळाच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले
त्रिदिनात्मक धार्मिक सोहळयात पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते ११ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायाचे पारायण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,रात्री ७ ते ९ हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.रविवारी दि.१२ एप्रिल रोजी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे मार्गदर्शक विश्वस्त वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के यांच्या काल्याच्या किर्तनाने त्रिदिनात्मक धार्मिक सोहळयाची सांगता होणार आहे

संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संत ज्ञानेश्वर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!