
आत्तापर्यंत सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य, दगड शेणगोळे यांच्या त्रासात केलेल्या शैक्षणिक कार्याचा प्रसार यावर जास्त प्रकाशझोत पडलेला आहे. परंतु त्यामुळे त्यांचे इतर कार्य सुद्धा समाजाच्या पटलावर येणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुले यांनी ‘ काव्य-फुले’ व ‘ बावनकशी सुबोध रत्नाकर ‘ असे दोन कवितासंग्रह लिहिले.

आपल्या ‘ काव्य-फुले’ या काव्यसंग्रहामध्ये शिवरायांबद्दल व्यक्त होताना म्हणतात, “छत्रपती शिवाजीचे | प्रात:स्मरण करावे |
शुद्रादि अतिशुद्रांचा प्रभु | वंदू मनोभावे |”
या चार ओळीच्या काव्यात त्या पहिल्यांदा शिवाजी महाराजांचे रोज प्रातःकाळी स्मरण करा. त्यानंतर युधिष्ठिर, द्रौपदी,भगवान विष्णू आणि नंतर शिवशंकराचे स्मरण करा. अशा म्हणत आहेत.

. प्रत्येक स्त्रीला आपल्या माहेरचा ओढा हा उपजतच असतो.
. त्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांना सुद्धा आपल्या नायगावच्या माहेरचा ओढा होता. त्यांनी आपल्या ‘माझी जन्मभूमी’ या माहेरच्या गावाबद्दल रचलेल्या कवितेत ” शिवप्रभुने राज्य स्थापिले कुणबी मराठ्यांचे, स्वराज्य झाले लोकहिताचे |” असा उल्लेख करून माझे माहेर नायगाव हे शिवप्रभूंच्या स्वराज्यामध्ये येते. याचा त्यांना विलक्षण अभिमान वाटतो.

. तसेच आपल्या ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या कवितासंग्रह मध्ये “स्वधर्मी अति यातना शुद्र भोगी, असे पशुतुल्य जिणे अभागी || म्हणोनी शिवाजी स्वराज्या उभारी | समाजी अति शुद्र लोकास तारी| ” असे म्हणून जेव्हा आपणाला पशुतुल्य जीवन जगावे लागले, यातना भोगाव्या लागल्या,तेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली, असा उल्लेख त्यांनी केलेला आहे.

. सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक प्रसार, विधवा महिलांना झालेली प्रसूती व त्यामधून 35 मुलांचा सांभाळ, म. फुले यांच्यानंतर सत्यशोधक समाजाच्या प्रसारासाठी घेतलेल्या अध्यक्षीय बैठका, स्वतः वेगवेगळ्या विषयावर केलेली भाषणे आणि ज्योतिबांना सुद्धा केलेला पत्रव्यवहार – त्यामध्ये प्रसंगी कलेक्टरची भेट घेऊन त्यांना दुष्काळाची परिस्थिती समजावून सांगून दुष्काळ पीडिताना केलेली मदत अशा अनेक गोष्टी या प्रकर्षाने पुढे यायला हव्यात.
. सावित्रीबाईंचा जेव्हा ‘काव्य फुले’ हा कविता संग्रह प्रकाशित झाल्यानंतर चाळीस वर्षांनी केशवसुत कवी यांचा जन्म झालेला आहे. तसेच अनेक निसर्ग कविताही त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये आहे.
. निसर्ग कवी बालकवी यांच्या पूर्वी पाउण शतक आधी सावित्रीबाईंनी आपल्या सामाजिक कार्याचा व्याप सांभाळून पिवळा चाफा, जाईचे फूल, जाईची कळी, फुलपाखरू व फुलाची कळी अशा अनेक निसर्ग कविता लिहिलेल्या आहेत.
त्याचबरोबर त्यांनी भगवान शंकरांना भौतिक सुख न मागता, आम्हाला ज्ञान देऊन आमचे अज्ञान दूर करा,अशी अनोखी मागणी सुद्धा एका कवितेत केलेली आहे.
शब्दांकन – शंतनू सूर्यकर
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







