
नेवासा – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, ज्ञानोदय इंग्लिश स्कूलने यंदाही आपल्या यशाची परंपरा कायम राखत ८३.२२ टक्के निकालाची नोंद केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये शाळेतील एकूण १६१ विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेला बसून त्यापैकी १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्तेच्या बाबतीतही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

यामध्ये आदित्य मनेश कुरूंद (९४.६०%) याने शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. अथर्व श्रीनिवास डहाळे (९१.२०%) द्वितीय, करण तुकाराम कारले (८९.००%) तृतीय क्रमांकावर राहिले. तसेच ऋषिकेश अनिल भाकरे (८८.२०%) यांनी चौथा, तर निरज संतोष चारंडे (८७.८०%) यांनी पाचवा क्रमांक मिळवला आहे.

या यशाबद्दल बोलताना शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचा एकूण निकाल ८३.२२ टक्के लागल्याबद्दल शिक्षकवर्गाच्या मेहनतीचे कौतुक केले. ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्याचे हे पहिलेच वर्ष असून, त्यातही मिळालेले यश उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







