माका | आदिनाथ म्हस्के : मौजे शिंगवे तुकाई, तालुका नेवासा येथे नुकतेच खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षण व विविध कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी श्री. बबन कराड साहेब यांनी कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. उपकृषी अधिकारी श्री. विजय बर्डे साहेब यांनी महाडीबीटी (MahaDBT) योजनेबद्दल सखोल माहिती दिली.

सहाय्यक कृषी अधिकारी श्री. गणेश भराट यांनी बीजप्रक्रिया आणि बियाणे उगवण क्षमता तपासणीचे महत्त्व पटवून दिले.
सहाय्यक कृषी अधिकारी श्री. रुपेश प्रकाशराव पवार यांनी जैविक निविष्ठा निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, खरीप हंगामातील प्रमुख पीक तंत्रज्ञान आणि माती परीक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष जैविक खते निर्मिती, माती परीक्षण, बीजप्रक्रिया आणि बायोचारचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

प्रगतशील शेतकऱ्याचा गौरव:
या कार्यक्रमात जैविक शेतीद्वारे डाळिंब व इतर पिकांचे दर्जेदार उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी श्री. बापू कुऱ्हाड यांचा कृषी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्री. योगेश भाऊ होंडे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.
उपस्थित शेतकरी:
या कार्यक्रमास युवा सरपंच श्री दीपक भाऊ पवार, योगेश भाऊ सुरेश होंडे, दत्तात्रय दरंदले साहेब माजी सहायक कृषी अधिकारी संजय भिमाजी पवार, सदाशिव लक्ष्मण हसनाळे, मच्छिंद्र हरिभाऊ विधाटे, कारभारी सुर्यभान गायकवाड, कारभारी गंगाधर पुंड, गणेश चांगदेव खरपुडे, दिपक कचरू पुंड, सुनील भाऊसाहेब विधाटे, ज्ञानदेव विठ्ठल पवार, सुरेश नामदेव विधाटे,

नवले प्रदिप,उंबर गणपत हवाले,किसन नामदेव पवार,पांडुरंग चिंतामण पवार, हरीभाऊ विठोबा शिंदे,शिवनाथ महाराज होंडे,अमोल नवनाथ पवार, चेतन राजेंद्र खरपुडे, गणेश खरपुडे,रामेश्वर अशोक पवार, सुदाम रामकृष्ण पवार, संतोष पवार,अमोल पवार, विठ्ठल कुऱ्हाट,भाऊसाहेब श्रीपती धायबर,केरू अहिल्याजी गवळी,संजय विठ्ठलराव होंडे,संभाजी कैलास आवारे, नवले प्रविण, सुनील पराजी विधाते, किशन रामभाऊ कुऱ्हाट यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







