आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
भोंदू बाबा

एवढे पैसे देऊन आणि होमहवन करूनही मुलाच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नसल्याने आणि उलट छळ वाढत असल्याने महिलेला आपली मोठी आर्थिक व शारीरिक फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

भोंदू बाबा

गतिमंद मुलाचा आजार पूर्णपणे बरा करण्याचं आणि भावाचं लग्न जमवून देण्याचं खोटं आमिष दाखवून एका भोंदू बाबाने हतबल कुटुंबाची तब्बल साडेसहा लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेरमध्ये उघडकीस आला. ही केवळ आर्थिक फसवणूक नसून, या नराधम भोंदू बाबाने मुलाला जिवंत मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचीही अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात मुख्य भोंदू बाबा, त्याचा मुलगा आणि एका महिला साथीदाराविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या 40 वर्षीय पीडित शेतकरी महिलेचा 17 वर्षांचा मुलगा हा मतिमंद आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्यातच शेतीत चांगले पिके येऊनही घरातील कर्ज फिटत नव्हते आणि गरिबी हटत नव्हती. 

भोंदू बाबा

याच दरम्यान पीडितेचा सख्खा भाऊ याचेही वय झाले तरी त्याचे लग्न जमत नव्हते. अशा अनेक कौटुंबिक अडचणींनी खचलेल्या या महिलेला पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथील राजू दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत दिवटे आणि त्यांची महिला सहकारी शोभा तरटे हे देवऋषी (देवभगत) असून ते कोणत्याही संकटावर हमखास तोडगा काढतात, अशी अंधश्रद्धेतून खोटी माहिती मिळाली होती.

पीडितेने वर्ष 2020 मधील कोरोना काळापासून या भोंदूबाबाकडे आपल्या समस्या घेऊन जाण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी पीडितेची हतबलता ओळखून संशयित भोंदूबाने, ‘तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मांढरदेवीच्या काळुबाईची मोठी बाधा आहे, ती घालवण्यासाठी घरात होमहवन आणि मोठी पूजा करावी लागेल,’ असं सांगून भीती घातली. 

भोंदू बाबा

मुलाच्या तांत्रिक उपचारासाठी 3 ते 4 लाख रुपये आणि भावाच्या लग्नाचा तोडगा काढण्यासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असं सांगून त्यांनी पीडितेकडून मुलाचे आणि भावाचे फोटो जादुटोणा व तंत्र-मंत्र करण्यासाठी मागवून घेतले.

सुरुवातीला पूजेच्या साहित्याच्या नावाखाली महिला सहकारी शोभा तरटे हिने 10 हजार रुपये रोख घेतले. अशा प्रकारे वेळोवेळी भोंदू बाबाने कुटुंबाकडून 6 लाख 50 हजार रुपये उकळले. एवढे पैसे देऊन आणि होमहवन करूनही मुलाच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नसल्याने आणि उलट छळ वाढत असल्याने महिलेला आपली मोठी आर्थिक व शारीरिक फसवणूक झाल्याचे समजलं. 

भोंदू बाबा

त्यानंतर तिने धीर धरून थेट पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताच तातडीने चक्र फिरवून रात्री उशिरा मुख्य भोंदू बाबा राजू दिवटे याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भोंदू बाबा
भोंदू बाबा
भोंदू बाबा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भोंदू बाबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!