नगर तालुका पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच धंदा सूरु होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी पहिल्यांदा डमी ग्राहक पाठवला. त्यानंतर घटनास्थळी खरंच वैश्याव्यवसाय सूरू असल्याची पुष्टी होताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने स्पा सेंटवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत स्पा मालकांसह चौघांवर बीएनएस आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबत 4 महिलांचीही सूटका करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेत नेमकं काय घडलं आहे? हे जाणून घेऊयात.

अहिल्यानगर येथील सावेडी उपनगरातील नगर-मनमाड रस्त्यावरील साई मिडास इमारतीत ॲक्युम स्पा सेंटर सुरु होता. या स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली महिलांना पैशांचे आमिष दाखवून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला होता.
पहिल्यांदा पोलीस डमी ग्राहक बनून स्पा सेंटरमध्ये घुसले, त्यानंतर आतमध्ये मसाजच्या नावाखाली भलतेच धंदे सूरु असल्याचे त्यांना कळताच त्यांच्या इशाऱ्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकून देहविक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश केला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







