नेवासा – नेवासा तालुक्यातील मक्तापुर येथील सुपुत्र ऋषिकेश नंदु कराडे या तरुणाची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली,तसेच नेवासा तालुक्यातील सचिन सूर्यभान गारुळे याची नुकतीच अग्निवीर मध्ये निवड झाली,तसेच दिघी गावचे सुपुत्र अजित भाऊसाहेब भक्त या तरुणाची धाराशीव जिल्हा पोलीस दलात निवड झाली.या तरुणांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केल्याबद्दल परिसरामधून या युवंकावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

या तरुणांना शारीरिक व बौद्धिक तयार करण्यात महत्वाचा वाटा समर्पण करिअर अकॅडमी नेवासा फाटा,मुकिंदपुर,ता.नेवासा चे संचालक प्रा.विकास शेलार व संस्थापक प्रा.दादासाहेब जायभाये यांचे विशेष सहकार्य लाभले.या तरुणांचा अत्यंत जल्लोषामध्ये व वाजत गाजत नेवासा फाटा परिसरामध्ये जंगी स्वागत करण्यात आला.याप्रसंगी मुकिंदपूरचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीश (दादा) निपुंगे,पोलीस पाटील आदेश साठे,मेजर ऋषिकेश कराडे यांचे वडील नंदु कराडे,मराठा सूकाणु समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे,गणेश कराडे,सुनिल कोळेकर,आदी मक्तापूर व मुकिंदपुर परिसरातील नागरिक या युवकांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







