आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अधिक मास

जागतिक साहित्याचा मुकूटमणी असलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ची लिखाणभूमी असलेल्या ऐतिहासिक नेवाशात अधिक मासाचे पावन पर्व देविदास रसाने न्हाऊन महाराज म्हस्के निघणार आहे. येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये रविवार, दि. १ जून ते ७ जून या कालावधीत संगीतमय ‘श्री ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा – स्थितप्रज्ञ दर्शन’ या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने या ज्ञानसोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, भाविकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

अधिक मास

हिंदू धर्मात अधिक मास हा भगवान विष्णूची भक्ती, कर्मयोग आणि आत्मचिंतनाचा पवित्र काळ मानला जातो. भगवद्‌गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील ५४ व्या श्लोकात अर्जुनाने श्रीकृष्णांना स्थितप्रज्ञ कोण अजुनान आणि त्याचे लक्षण काय?’ असा प्रश्न विचारला होता. यावर श्रीकृष्णांनी ज्ञानी पुरुषांचे जे स्वरूप सांगितले, त्याचेच माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात शेवटच्या ८६ ओव्यांमधून सखोल विवेचन केले आहे. याच दिव्य विचारांचा खजिना या सोहळ्यात उलगडला जाणार आहे.

अधिक मास

या सात दिवसीय सोहळ्यात रोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के हे आपल्या अमोघ वाणीतून संगीतमय चिंतन व प्रवचन करणार आहेत. गायन आणि निरूपणाच्या संगमातून ज्ञानेश्वरीतील हा कठीण भाग भाविकांसमोर सोपा करून मांडला जाईल. सध्या समाजात ज्ञानेश्वरी पारायणांची संख्या वाढत असली, तरी ग्रंथाचे चिंतन आणि आचरण मात्र कमी होताना दिसत आहे. आजच्या कलियुगात जागोजागी भोंदू साधू-संतांचा सुळसुळाट वाढला असताना, खरा ज्ञानी पुरुष कसा असतो आणि जीवनात मानसिक स्थैर्य कसे मिळवायचे, याचे मार्गदर्शन या सोहळ्यातून मिळेल. भगवान श्रीकृष्ण आणि माऊलींच्या विचारांचा हा संगम आजच्या पिढीला नवी दिशा देणारा ठरेल.

अधिक मास
अधिक मास

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अधिक मास
अधिक मास
अधिक मास

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अधिक मास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!