नेवासा – दि.4जून रोजी नेवासा तालुक्यातील मौजे धामोरी येथे नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तरुण युवा वर्गाच्या मागणीने भरभक्कम व्यायाम शाळेचे साहित्य, फिट करून आज त्याचा लोकार्पण सोहळा ग्रामस्थांच्या व ज्येष्ठ नागरिक युवा वर्गांच्या उपस्थितीत संपन्न झाला. धामोरी गावचे ज्येष्ठ भजनी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव रामचंद्र पटारे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून व्यायाम शाळा चे लोकार्पण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला

त्याप्रसंगी युवा कार्यकर्ते आदिनाथ पटारे , बहिरवाडी सोसायटीचे चेअरमन नवनाथ पाटील पटारे, जगन्नाथ महाराज पटारे,युवा नेतृत्व राम पटारे,रमेश ठोकळ,संदीप पटारे,अविनाश दाणे ,सोमनाथ ठोकळ,सागर दाणे,युवराज गायकवाड,महेश आडगळे, अनिल आढागळे, माधव पटारे, अश्विन पटारे,शुभम पटारे,ओम घोरपडे,भारत पटारे,विठ्ठल दाणे,आदी ग्रामस्थ व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व ग्रामस्थ व युवा वर्गाच्या वतीने तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे साहेबांचे गावाला जिम साहित्य दिल्याबद्दल आभार मानण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







