आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
वादळी

अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील कडगाव, मिरी, शंकरवाडी आणि शिराळ परिसराला काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जबरदस्त तडाखा दिला. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे अनेक ठिकाणी घरांचं, शेतीचं आणि वीज यंत्रणेचं मोठं नुकसान झालं असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

वादळी

कडगाव येथील शेतकरी विलास किसन शिरसाट यांच्या घरावर रात्री साडेनऊच्या सुमारास वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला. त्यावेळी कुटुंबातील सदस्य पडवीत झोपले होते. अचानक घरावरील पत्रे उडून गेली आणि त्यावरील भिंत थेट पडवीवर कोसळली. या दुर्घटनेत समाबाई विलास शिरसाट (वय 75) यांच्या डोक्यावर पत्र्याचा जबर मार लागल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत विलास शिरसाट, सागर शिरसाट, विराज शिरसाट, अलका शिरसाट यांच्यासह अन्य काही कुटुंबीय जखमी झाले आहेत. अचानक घर कोसळल्यानं काहीकाळ एकच गोंधळ उडाला होता. जखमींवर उपचार सुरू असून कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे.

वादळी

वादळी वाऱ्यामुळे मिरी आणि शंकरवाडी परिसरातील अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि तारा तुटून पडल्या. परिणामी अनेक गावांचा वीजपुरवठा रात्रभर खंडित झाला होता. नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. शिराळ परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेतातील सोलर पॅनलच्या प्लेटा उडून गेल्या असून सौर कृषी पंपांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी अक्षय निवृत्ती झाडे यांच्या गट क्रमांक 459 मधील ओसवाल कंपनीच्या सौर कृषी पंपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

अचानक आलेल्या या वादळामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकसानग्रस्त भागांचं तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

वादळी
वादळी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वादळी
वादळी
वादळी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वादळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!