
आपला जिल्हा : मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक श्री. सारंगधर भिकाजी ठोंबरे यांनी नुकतीच सहकुटुंब चारधाम यात्रा पूर्ण केल्यानंतर धार्मिक विधींना समाजसेवेची जोड देत एक आदर्श उपक्रम राबविला. यात्रेनिमित्त आयोजित पारंपरिक जलपूजन (मावंदे) कार्यक्रम शिर्डी येथील साई आश्रय परिवार, पिंपळवाडी रोड, साई निवारा (रुई) या अनाथ आश्रमात संपन्न झाला.

यावेळी अनावश्यक रूढी-परंपरांना फाटा देत श्री. ठोंबरे यांनी अत्यंत साधेपणाने व पारंपरिक पद्धतीने पूजन केले. त्यानंतर आश्रमातील सुमारे ३०० अनाथ मुलांना पूरणपोळी, आंबा रस व धोड्याच्या जेवणाचा स्वादिष्ट महाप्रसाद देण्यात आला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमानिमित्त पुणतांबे येथील मुक्ताई ज्ञानपीठाचे ह.भ.प. स्वरूपानंदगिरीजी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या प्रवचनात महाराजांनी श्री. ठोंबरे यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. धार्मिक कार्यक्रमास समाजसेवेची जोड देऊन अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच त्यांचे पराग व प्रीतिश या दोन मुलांच्या हातून अशीच सामाजिक सेवा देणेचे कार्य होऊ सर्व कुटुंब उच्च शिक्षित आणि संस्कारी म्हणून संपूर्ण परिसरात प्रचिती आहे श्री सारंगधर ठोंबरे यांनी मुळा कारखान्यात कार्यकारी संचालक पदावर काम करत असताना अनेक सामाजिक धार्मिक कार्यात अनमोल योगदान दिले आहे.

या कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर व भाविक, नातेवाईक उपस्थित होते. श्री. सारंगधर ठोंबरे यांच्या या अनोख्या उपक्रमाचे पुरणगाव ता वैजापूर या सह शिर्डी परिसरातून विविध स्तरांतून स्वागत होत असून, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







