आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
भालगाव
भालगाव

नेवासा : नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथे पाण्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे भालगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये भास्कर देवराव तनपुरे (वय 50, रा. भालगाव) व सार्थक गणेश निमसे (वय 16, रा. भालगाव) यांचा समावेश आहे. दोघेही पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भालगाव


घटनेची माहिती मिळताच शिवशंभो ॲम्बुलन्स सर्विस, नेवासाचे चालक अनिल मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे करण्यात येत असून घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भालगाव गावावर शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे

भालगाव
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भालगाव
भालगाव
भालगाव

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भालगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!