आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
चैतन्य कानिफनाथ महाराज
चैतन्य कानिफनाथ महाराज

नेवासा – तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथे सालाबाद प्रमाणे दोन दिवस चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त मंदिराच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

चैतन्य कानिफनाथ महाराज

दि. २५ मार्च २०२६, बुधवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात ‘झेंड्याची व अश्व मिरवणूक’ काढण्यात आली. गावातील महिलांनी रस्त्यावर रांगोळी काढून अश्व चे पूजन केले.या मिरवणुकीत तरुणांनी भगवा ध्वज हाती घेत नृत्य सादर केले व जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर देवाची महाआरती संपन्न झाली. मिरवणुकीनंतर अशोक बबन आगळे यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाची पंगत आयोजित करण्यात आली.

चैतन्य कानिफनाथ महाराज

गुरुवारी, यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०७ ते ०९ या वेळेत ह.भ.प. किरण महाराज हराळे (नांदुरढोक)यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली, जिथे हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चैतन्य कानिफनाथ महाराज

यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी विविध प्रकारचे खाऊ चे स्टॉल लावले होते. या यात्रेने संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण केले होते आणि भाविकांना अध्यात्मिक आनंद प्राप्त झाला.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चैतन्य कानिफनाथ महाराज
चैतन्य कानिफनाथ महाराज
चैतन्य कानिफनाथ महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चैतन्य कानिफनाथ महाराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!