नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील मक्तापूर ग्रामपंचायत कार्यालयात भगव्या ध्वजाच्या पूजनाने शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला यावेळी प्रगतशील शेतकरी अंबादास कांगुणे,मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलतांना गणेश झगरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी स्वराज्य स्थापन करून स्त्रीयांवर होणारे अत्याचार थांबवण्याचे कार्य केले.त्यांच्या कारकीर्दीत एखाद्या महिलेवर अत्याचार केल्यास हात पाय तोडून न्याय मिळवून देत परस्त्री ही मातेसमान ते मानत,महिलांना आदराची वागणुक मिळत होती असे त्यांनी सांगितले
या रयतेच्या राजाच्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम प्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे
छबुराव बर्डे,ग्रामसेवक दत्तात्रय गर्जे,रामदास कांगुणे, अमोल भागवत,गोरक्षनाथ बर्डे,सुनील साळवे,तन्मय पांडागळे,आजिनाथ सुभाष बर्डे,राहुल जामदार,अजित झगरे,मनोज झगरे यांच्यासह मक्तापुर परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







