आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
जेजुरी
जेजुरी

नेवासा – नेवासा बुद्रुक ही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबारायांची सासुरवाडी असल्याने अधिक पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने धोंडा भोजनाचे निमंत्रण खंडोबारायांना जेजुरी येथे जाऊन  देण्यात आले. शनिवारी दि.१३ जून रोजी नेवासा बुद्रुक येथील पुरातन म्हाळसा खंडोबा बाणाई मंदिर प्रांगणात धोंडा भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जेजुरी

श्री खंडोबादेवा आपण पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने म्हाळसा माहेर व आपली सासुरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथे धोंडा भोजनास यावे अशा आशयाचा मजकूर छापलेली पत्रिका नेवासा बुद्रुक येथील पुरातन म्हाळसा खंडोबा बानाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संभाजीराव ठाणगे,विश्वस्त राजेंद्र काशीद,पुरातन देवस्थान प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या हस्ते जेजुरी येथे जाऊन खंडेरायांच्या चरणी अर्पण करण्यात आली.

जेजुरी

निमंत्रण पत्रिका अर्पण करतेवेळी श्री खंडोबारायांच्या मूर्तीचे वेदमंत्राच्या जयघोषात पूजन करण्यात आले. पुजारी निलेश बारभाई यांनी पूजेचे पौरोहित्य केले.यावेळी श्री मार्तंड देवस्थान जेजुरी पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे,पालखी मानकरी, सोमनाथ शेवाळे,देवस्थान कर्मचारी कल्याण चव्हाण, महेश शिंदे उपस्थित होते.यावेळी देवस्थान विश्वस्त मंडळासह प्रशासकीय अधिकारी यांना ही निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या.

जेजुरी

नेवासा बुद्रुक हे खंडोबारायांची पत्नी म्हाळसादेवी यांचे माहेर घर असल्याने जावई या नात्याने परंपरेनुसार खंडोबारायांना म्हाळसा माहेर असलेल्या नेवासा बुद्रुक येथून धोंडा जेवणाचे निमंत्रण तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासाच्या निमित्ताने देण्यात येते.धोंडा कार्यक्रमाच्या निमित्ताने संत महंतांसह येथील विवाहबद्ध झालेल्या लेकी जावयांना ही निमंत्रण देण्यात आले असून शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास होणाऱ्या धोंडा कार्यक्रमाला ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुरातन म्हाळसा खंडोबा बाणाई जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष संभाजीराव ठाणगे यांनी केले आहे.

जेजुरी

खंडोबारायांची सासुरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथे परंपरेनुसार चंपाषष्ठी उत्सव देखील मोठ्या थाटात साजरा केला जातो.चंपाषष्ठीला खंडोबादेव सासुरवाडीला जेवण्यासाठी येतात आणि त्यांना प्रिय असलेली वांग्याचे भरीत व बाजरीची भाकरी खातात ही भाविकांची धारणा असल्याने दरवर्षी हा उत्सव खंडोबारायांच्या सासुरवाडीत उत्साहात साजरा केला जातो,देवांचे आगमन म्हणून पालखीतून शोभायात्रा मिरवणूक काढली जाते.वाहन म्हणून घोडयाची पूजा मिरवणूक काढून केली जाते.

जेजुरी

शनिवारी दि.१३ जून रोजी खंडोबारायांच्या सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथे धोंडा कार्यक्रमाच्या निमित्ताने सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रम प्रसंगी वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक त्यानंतर तळी भंडार करण्यात येऊन धोंडा भोजन निमित्ताने पंच पक्वान्नाचा भोग खंडोबादेवांना देण्यात येणार आहे.याप्रसंगी येथील जावई बापूंचा सन्मान करण्यात येऊन उपस्थित भाविकांना धोंडा भोजन देण्यात येणार आहे

जेजुरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जेजुरी
जेजुरी
जेजुरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जेजुरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!