
नेवासा : संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान, नेवासा येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मोफत दंत तपासणी व मौखिक आरोग्य जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत मौखिक आरोग्याच्या समस्या असलेल्या गरजू रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली.

यावेळी भाविकांना दात व हिरड्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करून मौखिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच पुढील दंत उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना अहिल्यानगर येथील श्री यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयात उपचारासाठी येण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

दात निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य पद्धतीने दातांची निगा कशी राखावी, दात घासण्याची योग्य पद्धत, नियमित दंत तपासणीचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच उपस्थित भाविकांना मोफत टुथब्रश व टुथपेस्टचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम डॉ. कीर्ती आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. शिबिराच्या आयोजन व अंमलबजावणीत समृद्धी आंबेडकर, सच्चिदानंद आंधळे, वेदांत अंधुरे, क्षितिज बनकर, मानसी भंडारी, प्रज्ञा भराटे, वैष्णवी भोजने, भावना भोसले, जुई ढोले, पायल डिसले आणि सानिका चहाड यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

या उपक्रमामुळे भाविकांमध्ये मौखिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन अनेक गरजू रुग्णांना दंत उपचारांविषयी योग्य मार्गदर्शन मिळाले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.




कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







