
नेवासा – ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा येथे इयत्ता पाचवीच्या नवागत विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी रंगीबेरंगी फुग्यांची (बलून) सजावट करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

शाळेत पहिल्या च दिवशी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास ह.भ. प. श्री उद्धवजी महाराज मंडलिक, संस्थेच्या सदस्य माननीय ॲड. अलकाताई जंगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रावसाहेब चौधरी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच ह.भ.प. श्री उद्धवजी महाराज मंडलिक व ॲडव्होकेट अलकाताई जंगले यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले व श्री धस सर यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय आखाडे यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाबाबत आनंद व उत्सुकता दिसून आली. शाळेच्या या अभिनव स्वागत उपक्रमाचे पालक व उपस्थितांनी कौतुक केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







