आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
फसवणूक

नेवासा- जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सावेडी येथील डॉक्टरची तब्बल १४ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीला येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अमोल बबन जाधव (वय ४०, रा. मोरगव्हाण, ता. नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याला सोमवारी (१५ जून) येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर ‘हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची (२० जूनपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

फसवणूक

डॉ. अनिल सुर्यभान आठरे (वय ७३, रा. झोपडी कॅन्टींग, सावेडी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी ८ नोव्हेंबर २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३० जणांच्या टोळीविरोधात कटकारस्थान रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील मुख्य संशयित अमोल जाधव हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. त्याचा घेतला शोध पोलिसांकडून जात होता तो. एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने जाधव याला एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भाजपाचा माजी नगरसेवक स्वप्नील रोहीदास शिंदे, अमोल जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून कट रचला.

संशयित आरोपींनी डॉ. आठरे यांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये सुरूवातीला त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती दाखवल्या.इतकेच नाही, तर बनावट मालक उभे करून, त्यांच्या बनावट सह्या करून डॉ. आठरे यांना दस्त हस्तांतरित केले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी डॉ. आठरे यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. त्यांची एकूण १४ कोटी ६६ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फसवणूक
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

फसवणूक
फसवणूक
फसवणूक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

फसवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!