आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
आरोग्य

​शिंगवेतुकाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच नवीन प्रवेशोत्सव आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शिवनाथ महाराज होंडे हे होते.

आरोग्य

या शिबिरात बालकांची आरोग्य तपासणीचे नियोजन ग्रामिण रुग्णलायचे वैद्यकीय अधिक्षक मा.डॉ.रामेश्वर काटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.
​या तपासणी शिबिरासाठी प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. विजयकुमार आवारे (मेडिकल ऑफिसर RBSK) आणि डॉ. मिनाक्षी उद्धव हरिश्चंद्रे (Rbsk मेडिकल ऑफिसर) उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सर्व मुलांची अत्यंत बारकाईने आरोग्य तपासणी केली. बदलत्या हवामानानुसार मुलांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबाबत डॉ. आवारे व डॉ. हरिश्चंद्रे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
​यावेळी औषध निर्माण अधिकारी (फार्मसिस्ट) श्री. सारंग राऊत यांनी विद्यार्थ्यांना औषधांचे वाटप व त्यांच्या वापराबाबत माहिती दिली. तसेच श्री. वसंत कांगुणे यांनीही या मोहिमेत महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

आरोग्य

शाळेच्या पहिल्याच दिवशी बालकांना शालेय साहित्य आणि गणवेश वाटप योगेश सुरेश होंडे,माजी सरपंच शिंगवे तुकाई,
दीपक उद्धव पवार,अध्यक्ष शालेय समिती, भाऊसाहेब श्रीपती धायबर
केरू अहिलाजी गवळी, सुनील विधाटे, योगेश गुंड, कानीफ पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रवेशोत्सव आणि आरोग्य तपासणी साठी नियोजन
​हे शिबिर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. गिरी योगिता रतन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी अशा तपासणी मोहिमा अत्यंत गरजेच्या असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आरोग्य

याप्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद श्रीमती. भगुरे योगिता दिलीप, श्री. मगर संदीप अशोक आणि श्रीमती.आवारे मनिषा अशोक उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी शिबिर यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
​थोडक्यात पण महत्त्वाचे:
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांच्यातील आजारांचे वेळीच निदान व्हावे, या उद्देशाने या आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील सर्व मुलांनी या सुविधेचा लाभ घेतला. पालकांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

आरोग्य
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोग्य
आरोग्य
आरोग्य

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!