प्रवासी संघटना अध्यक्ष अनिल ताके यांचा सवाल
नेवासा –संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांबाची पवित्र भूमी, श्रीक्षेत्र देवगड, शनिशिंगणापूर आणि शिर्डी या चारही महत्वाच्या तीर्थक्षेत्रांवर ये-जा करणाऱ्या भाविकांची सर्वाधिक वर्दळ नेवासा तालुक्यातूनच होते. तरीही नेवासा डेपोला शिवाई बस का नाही? असा सवाल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल ताके यांनी केला आहे.

नेवासा ते संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, पुणे, शिर्डी, संगमनेर, नाशिक या मार्गावर धावणाऱ्या बसेस प्रत्येक छोट्या थांब्यावर थांबतात. २ तासांचा प्रवास ४ तासांवर जातोय. जुनाट झालेल्या बस गाड्या ही नेवासा डेपोची खरी ओळख बनलीय. इतर डेपोला लालपरी व शिवाई बस कशा मिळतात ? श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, पारनेर या डेपोला विना थांबा शिवाई, बस सेवा सुरू होऊन वर्षे उलटली. त्यामुळे त्या डेपोचं उत्पन्न वाढलं, प्रवाशांचा प्रतिसाद वाढला, एसटीला महसूल मिळाला.

मग नेवासा डेपोला डावललं का जातंय. याचं उत्तर एसटी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडे आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नाकडे पाहण्याची तसदी देखील अधिकारी घेताना दिसत नाहीयेत. फायलींमध्ये धूळ खात पडलेल्या मागणीकडे पाहण्याची उदासीनता आता संतापात बदलतेय. नेवासा डेपोला शिवाई बस मिळाली तर फक्त प्रवाशांचा वेळ वाचणार… नाही, तर नेवासा डेपोचं उत्पन्न देखील दुप्पट होऊ शकेल. नेवासा बस डेपोला तातडीने नविन गाड्या व विना थांबा शिवाई बस सेवा द्या. एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन निर्णय द्यावा.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







