नेवासा – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नेवासा यांच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कामिका एकादशी महाभिषेक व महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले.संस्थानचे अध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या भेटीत नुकताच यशस्वीरीत्या पार पडलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.

पालखी सोहळ्यादरम्यान प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा, प्रभावी नियोजन आणि समन्वयाबद्दल संस्थानच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानण्यात आले.यावेळी गुरुवर्य देविदास बाबा म्हस्के यांच्या संकल्पनेतून ईमानपूर घाटाला **’श्री ज्ञानेश्वरी घाट’** असे नामकरण करण्यासाठी शासकीय स्तरावर आवश्यक प्रयत्न करावेत, अशी विनंतीही पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त कैलासभाऊ जाधव, जनसंपर्क अधिकारी आशीष कावरे तसेच संतसेवक प्रा. संकेत गवळी उपस्थित होते.भक्ती, लोकसेवा आणि सुशासन यांचा समन्वय अधिक बळकट व्हावा, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







