नेवासा – तालुक्यातील खूपटी येथे शेतकरी मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश काका कारले होते. सरपंच गोरक्षनाथ तनपुरे यांनी प्रस्तविक करून सर्वांचे स्वागत केले. माजी कुलगुरू डॉ अशोकराव ढगे यांनी शेतकऱ्याच्या आत्महत्या बद्दल दुःख व्यक्त करून शेत मालाला हमीभावाचे कायदेशीर संरक्षण अत्यावश्यक झाल्याचे प्रतिपादन केले.

डॉ रमेश हापसे यांनी ऊस उत्पादन वाढीच्या संदर्भात अनेक मुद्दे विशद केले. बेण्याची निवड पाणी व्यवस्थापन खतांचा संतुलित वापर याविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ डी बी ताकटे यांनी जिवाणू खतांचे महत्त्व व विविध पिकांसाठी उपयुक्तता यावर माहिती दिली जमिनीतील जिवाणूंची संख्या कमी होत असून त्यासाठी प्रत्येक पिकाला जिवाणू खत वापरावीत ती हाताळण्यास सोपी स्वस्त असून त्याची जमिनीच्या आरोग्यासाठी गरज निर्माण झाली आहे.

उपसरपंच किशोर कुऱ्हे, सोसायटी चेअरमन प्रकाश कारले,, व्हाईस चेअरमन सुनील गव्हाणे, तंटामुक्ती अध्यक्ष गोवर्धन गव्हाणे, सोमनाथ काळे, कृषी अधिकारी शेळके पाटील, गोणेगाव चे माजी सरपंच प्रकाश रोडे, सोपानराव शिंदे भाऊसाहेब चौधरी, व जगदीश चौधरी यांनी शेतीच्या संदर्भातील अनेक प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला. शेतमालाचे अर्थशास्त्र, ऊस उत्पादन वाढीचे तंत्र व मंत्र तसेच जिवाणू खतांचा निर्णायक वापर यावर वैचारिक सखोल चर्चा झाली. सर्वांचे आभार प्रदर्शन प्रवीण कुऱ्हे यांनी केले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







