आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गोमांस

नेवासा- दि.०७/०८/२०२६ रोजी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय बातमी दारामार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की नाईकवाडी मोहल्ला आयशा मज्जीत शेजारी नेवासा खुर्द येथे ईसम नामे आय्याज लालु चौधरी व अबु शामु चौधरी हे त्यांचे साथीदारांचे मदतीने आपले राहते घरात गोवंशिय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी नेवासा पोलीस स्टेशन येथील पथकाने पंचासह छापा कारवाई केली असता दोन्ही ठिकाणी १,१२,५००/-रु किमतीचे एकुण ४५० किलो गोमांस व ३८,५००/-रु कि.चे. इतर साहीत्य त्यात फ्रिज, लोखंडी सत्तुर, वजन काटे असे एकुण १,५०,५००/- रु किम.चा मुद्देमाल हस्तगत करुन

गोमांस

आरोपी नामे १) आय्याज लालु चौधरी २) तनवीर आय्याज चौधरी ३) उवेश आय्याज चौधरी ४) मुस्ताक उस्मान शेख ५) मुजफ्फर अब्बास चौधरी ६) आबु शामु चौधरी ७) अरबाज अबु चौधरी सर्व रा नाईकवाडी मोहल्ला आयशा मज्जीत शेजारी नेवासा खुर्द, ता नेवासा, जि अहिल्यानगर यांचे विरुद्ध नेवासा पोलीस ठाणे गुन्हा रजि क्रमांक ६६३/२०२६ महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनीयम चे कलम ५,५ (क), ९, ९ (अ), अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गोमांस

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मुम्मका सुदर्शन सो अहिल्यानगर, अपर पोलीस अधिक्षक श्री वैभव कुलबुर्गे सो, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ वाकचौरे सो, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री निरज राजगुरु सो यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्री. प्रताप दराडे सो, स पो नि अमोल पवार, पो.हवा. रविंद्र शेळके, पो. शि वासुदेव डमाळे, पो शि संदिप ढाकणे, पो शि आप्पासाहेब वैद्य, म पो शि वर्षा कांबळे यांनी केली आहे.

गोमांस

मा. पोलीस अधिक्षक श्री मुम्मका सुदर्शन सो यांनी गोवंशिय जनावरे यांची कत्तल, वाहतुक तसेच विक्री करणा-यां विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११२ अन्वये संघटीत टोळी यांचे विरुद्ध प्रभारी कारवाई करण्याचे तसेच त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करुन सदर गुन्ह्यांना प्रतिबंध बसुन आळा बसावा व पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करण्यास कोणती टोळी अगर ईसम धजावणार नाही अशी प्रभावी कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले आहे.

गोमांस

अहिल्यानगर जिल्ह्यात अगर नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारे गोवंशिय जनावरांची कत्तल, वाहतुक अगर विक्री करत असल्याचे निर्दशनास आल्यास त्वरीत डायल क्र. ११२ प्रणालीवर संपर्क करावा तसेच नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे कोणी ईसम अगर टोळी करीत असताना निर्दशनास आल्यास खालील नंबरवर संपर्क करुन त्वरीत माहिती देण्याबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री मुम्मका सुदर्शन सो यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.

मा.पो.ना.प्रताप दराडे तर मोब. ७३८५५५३१२०

पो.स.ई. विकास पाटील मो.क्र. ७७७४९४७२६०

एस.पी.एन. अमोल पवार मोबाईल नं. ७५८८८२४१७२

नेवासा पो.स्टे. फोन क्र ०२४२७ – २४१२३३

गोमांस
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोमांस
गोमांस
गोमांस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोमांस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!