पाचेगाव – नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीवरील प्रथम असणारा पाचेगाव बंधाऱ्यात एन उन्हाळ्यात पाणी सोडवून तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार देण्याचे काम आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले.त्याबद्दल त्या ऋणातून थोडीफार उतराई म्हणून आमदार लंघे यांच्या हस्ते या बंधाऱ्याच्या पाण्याचे जलपूजन करून शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी त्यांचा आभार व्यक्त करून सत्कार केला. आमदार लंघे पाचेगाव येथील बंधाऱ्यावर येताच परिसरातील गावातील शेतकरी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थित, त्यात काही ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी बंधाऱ्यात पाणी जास्त काळ ठिकत नसल्याने काहीतरी उपयोजन करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन दिली.आमदार लंघे यांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून भविष्यात बंधारा पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी प्रयन्त करू असे आश्वासन यावेळी दिले.

यावेळी विठ्ठलभाऊ मते,बाळासाहेब ससे, माऊली पेचे. बाळासाहेब पवार, मा संचालक शांताराम तुवर, शेतकरी संघटनेचे हरिभाऊ तुवर, विक्रम तुवर, श्रीकांत पवार, हरिभाऊ जगताप, अशोक कुलकर्णी, अशोक मतकर, ऋषिकेश शेटे, दरकुंडे बाप्पुसाहेब, शिवाजी पवार, किरण जाधव, दादासाहेब होन,लक्ष्मण माकोने,दिगंबर नांदे, दत्तात्रय पाटील, समत कुलकर्णी, सुनील शिंगोटे,योगेश थिटे, अनिल पडूंरे, आदिनाथ पटारे, सुभाष पवार, संजय पवार,आप्पासाहेब काळे, अशोक मतकर. ज्ञानेश्वर मतकर, अविनाश सोनावणे. सुरेश पांडुरे,अमोल गायकवाड. गणेश तुवर,सुधाकर शिंदे, बाप्पू गोरे,

ज्ञानदेव आढाव उपसरपंच पाचेगाव,पवन पवार, राहुल तुवर, राहुल पंडित, भास्कर तुवर, गणेश माकोणे, ज्ञानेश्वर घोगरे, चैतन्य कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, प्रशांत विधातटे, नदराज घोगरे नारायण पांडुरे, रामदास भिसे ,अंबादास रोडे, भाऊसाहेब जाधव, बाबासाहेब जाधव, पाटबंधारे विभागाचे शाखा उपअभियंता मारवाडे,बेलपिपळगाव शाखाधिकारी घोंगडे यांच्या सह परिसरातील पाचेगाव, इमामपूर, गोनेगाव,निंभारी, पुनतगाव आदी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.