नेवासा – नेवासा पोलिसांनी नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्रेते, मटका जुगार खेळविणारे तसेच गांजा पिणाऱ्या इसमांवर छापेमारी करून गुन्हे दाखल केले आहेत.
दि. २५ मार्च रोजी सायंकाळी व दि. २६ मार्च रोजी पहाटे परिवक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्री, मटका जुगार खेळविणारे तसेच गांजा पिणाऱ्या इसमांची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एकूण ११ पथके तयार करून त्यांना सदर ठिकाणी पंचासह जावून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या.

त्यानुसार सदर पथकाने पोलीस स्टेशन हद्दीमधील मिळालेल्या माहितीनुसार ठिकठिकाणी जाऊन छापेमारी करून मुंबई दारुबंदी कायद्याखाली एकूण १४, मुंबई जुगार कायद्याखाली एकूण ०३ व एनडीपीएस कायद्यांतर्गत ०१ असे एकुण १८ गुन्हे दाखल केले. सदर छापेमारी एकूण ५६ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पा. अधिकारी सुनील पाटील यांच्या मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ. खाडे यांनी व त्यांच्या पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.