पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील जागृत देवस्थान चैतन्य श्री क्षेत्र गहिनीनाथ महाराजांच्या यात्रेस आज गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. अक्षय तुतीया झाल्यानंतर येणाऱ्या शुक्रवारी प्रमुख यात्रा भरते.
यावेळी गावातील तरुणांनी घोगरगाव येथून कावडीने आणलेल्या गंगा जलाची सवाद्य मिरवणूक होऊन चैतन्य गहिनीनाथ महाराजांचा जलाभिषेक करण्यात येतो. गावातील सर्व देवतांना गंगाजल अर्पण करण्यात येते.

सायंकाळी ६ वाजता कावडी, काठी व संदल मिरवणूक होणार आहे. तसेच गुरुवारी सायं. ८:०० वा. महाराष्ट्राचे लाडके नाथगायक आकाश शिंदे यांचा भक्ती गीतचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार दि.२ मे २०२५रोजी रात्री ९ वाजता छबीना मिरवणूक, रात्री १२ वाजता शोभेची दारूची आतिषबाजी, शनिवार दि.३मे२०२५ रोजी सायं. ७.३० वा. स्नेहा पिंपरीकर बहारदार लावण्याचा ऑर्केस्ट्रा नृत्याविष्कार कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

रविवार दि.मे रोजी दुपारी ११ ते ६ वाजेपर्यत आकर्षक बक्षीसासह घोडा बैल शर्यत शमीगोंडा कार्यक्रम असे विविध कार्यक्रमाचे आयोजन या यात्रोत्सवात करण्यात आले आहे. तरी सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.