यंदाही विज्ञान शाखेचा १२वी चा एच.एससी.बोर्ड परीक्षेचा १००% निकाल लागला.
नेवासा | नाथाभाऊ शिंदे पाटील – तालुक्यातील भानस हिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल व ज्यू.कॉलेज इयत्ता १२वी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक कु. तऱ्हाळ सुदर्शन दत्तात्रय ७१.५०%, व्दितीय क्रमांक कु.क्रमांक आठरे हिमांशू अशोक६९.१७%, तृतीय क्रमांक कु.दरंदले ज्योती प्रवीण६६.५०%यांनी पटकाविला.
यावर्षी 33 विद्यार्थ्यांपैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजेच शंभर टक्के निकाल लागला या यशाबद्दल या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.सुरेशराव बेल्हेकर व संचालिका डॉ. रंजनाताई बेल्हेकर यांनी अभिनंदन केले.

यावेळी संस्थेचे संचालक अभिषेक दादा बेल्हेकर, प्रशासकीय अधिकारी रोहन कांडेकर, संस्थेचे ऑफिस सुप्रीटेंडट शिवनारायण वाघे, ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूलचे व ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य काकासाहेब वाल्हेकर, ज्ञानेश्वर शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती वाघे,तसेच विभाग प्रमुख अमोल विघे, संगीता हापसे, नानासाहेब गायकवाड, यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महेश भणगे, मयुरी निपुंगे,ज्ञानेश्वर जाधव,रविंद्र आदमाने, दत्ता पाटील, प्रवीण जाधव, बापूसाहेब नवथर, मयुरी नेटके, शुभांगी पंडित या सर्व शिक्षकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.