नेवासा – मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये दोन वर्षांकरिता अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आरोपी नदीम सत्तार चौधरी यास नेवासा पोलिसांनी ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पथक तुकाराम महाराज चौक नेवासा खुर्द ते ईदगाह परिसरात पेट्रोलिंग करित असताना हद्दपार इसम नदीम सत्तार चौधरी हा ईदगाह मैदान येथे मिळून आल्याने त्यास पोलिसांनी त्याचे नाव-गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव नदीम सत्तार चौधरी, रा. खाटीक गल्ली, नेवासा खुर्द असे सांगून त्यास अहिल्यानगर जिल्ह्याचे कार्यक्षेत्रात परत आल्याबाबत हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची अगर न्यायालयाची कोणतीही लेखी परवानगी घेतल्याबाबत विचारणा केली असता अशी कोणतीही लेखी परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. त्याचे विरुध्द पोलीस कॉन्स्टेबल अरविंद वैद्य यांचे फिर्यादीवरून नेवासा पोस्टे गुन्हा रजि नं ४६६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २२३ सह मुबंई पोलीस अधिनियम कलम – १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.