ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
महाराणा प्रताप

नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात थोर शूरवीर महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात, साजशृंगाराने व देशभक्तिपर वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पोलीस पाटील आदेश साठे व प्रिन्स शिव महाराणा प्रताप संघटनेचे संस्थापक बादल परदेशी , भुमिअभिलेख कार्यालयाचे रगडे साहेब व भिंगारदिवे पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी चौकात विविध मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष उर्जा लाभली. नागरिक, व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करत त्यांच्या पराक्रमाला अभिवादन केले.

महाराणा प्रताप

या कार्यक्रमात बोलताना बादल परदेशी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “शिव महाराणा प्रताप चौकात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू असून, लवकरच या ऐतिहासिक चौकात हे कार्य पूर्णत्वास जाईल.”

तसेच रगडे साहेब यांनी हलदी घाटी युद्धाची महाराणा प्रतापच्या पराक्रमाची आठवण करून दिली, व पोलीस पाटील आदेश साठे यांनी महाराणा प्रताप यांचे जीवनावर प्रकाश टाकून अनेक आठवणींना उजाळा दिला

महाराणा प्रताप

या घोषणेने उपस्थितांमध्ये उत्साह व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरल्याबद्दल प्रिन्स शिव महाराणा प्रताप आयोजन समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील आदेश साठे , प्रिन्स शिव महाराणा प्रताप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बादल परदेशी, करणी सेना महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सुनील परदेशी,भूमी अभिलेख कार्यालयाचे साहेब श्री रगडे पाटील , महेंद्र नजन,ज्येष्ठ पत्रकार संभाजी पठाडे, दैनिक लोक परिवर्तन चे संपादक आबासाहेब शिरसाट, पत्रकार सचिन कुरुंद ,पत्रकार पंडित, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, गणपतराव मोरे, पप्पू परदेशी, सचिन परदेशी, सुकाणू समिती प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, भिंगारदिवे पाटील, राम मगरे ,किरण चव्हाण ,आकाश चव्हाण, राम चांदणे, गवळी पाटील, कराडे पाटील, सह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

महाराणा प्रताप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांचा लवकरच पुतळा शिव महाराणा प्रताप चौक नेवासा फाटा येथे उभारणार

महाराणा प्रताप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराणा प्रताप
महाराणा प्रताप
महाराणा प्रताप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराणा प्रताप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *