ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
मारहाण

नेवासा – नेवासा शेवगाव राज्यमार्गावरील भेंडा शिवारात असलेल्या हॉटेल अमित येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरगुती जेवणाच्या हॉटेलवर घाड टाकली. हॉटेल चालकाला ‘तू येथे दारु विकतो ?’ असे म्हणून नगरच्या गुन्हे शाखेतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी हॉटेल चालकासह हॉटेलात काम करणाऱ्या महिलांना जबर मारहाण केली. यामध्ये चार पुरुष व दोन महिला पोलिसांच्या या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याची घटना भेंडा येथे घडली.

दरम्यान, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर संतप्त हॉटेल चालकांसह गावकऱ्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात घाव घेऊन नगरच्या गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची एकमुखी मागणी केली. याबाबत लवकरच राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महेश वाघडकर याने दिली.

मारहाण

अमानुष मारहाणीमुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांना निलंबित करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना वाघडकर कुटुंबियांकडून देण्यात आले. त्यामुळे नगरच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांचा प्रताप चव्हाट्यावर आला आहे.

सोमवार (दि.७) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास हॉटेल अमित येथे चारचाकी वाहनातून तीन इसम साध्या गणवेशात खाली उतरले. त्यांनी हॉटेलात उचकापाचक सुरु केली असता त्यावेळी हॉटेलचालकांनी ‘तुम्ही कोण आहात?’ उचकापाचक का करता? अशी विचारणा केली असता काऊंटरवर बसलेल्या महेश वाघडकर याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तू येथे दारु विकतो?’ असे विचारले असता येथे दारु विकत नाही, वाघडकर याने सांगितले. यावर पोलिसांचा चांगलाच पारा चढला. गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार ओमकार फोलाने यांनी हॉटेलचालकाच्या कानसुळात मारली आणि त्याला हॉटेलच्या बाहेर ओढत हॉटेलचे सीसीटी कॅमेऱ्याचे तोंड दुसरीकडे फिरवून जबर मारहाण सुरु केली.

मारहाण

तर आकाश काळे या पोलीस कर्मचाऱ्याने हॉटेलचालकाला १५ देशीदारु व इंग्लीश दारुच्या सिलबंद बाटल्या दे, नाहीतर तुझ्यावर कारवाई करु, अशी धमकी दिली. हॉटेलचालकांनी पोलिसांना सांगितले, सगळीकडे उचकापाचक केली, तुम्हाला दारु मिळालेली नाही, आम्ही दारु विकत पण नाही, असे सांगितले. यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अमानुषपणे मारहाण सुरु केली. त्याने हा प्रकार घरी सांगून घरची मंडळीही हॉटेलकडे बोलावून घेतली. पोलिसांना घरच्या मंडळींनीही आमचे घरगुती जेवणाचे हॉटेल आहे, येथे दारु विकली जात नाही, असे समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांनाही चांगलीच मारहाण केली. हॉटेलमधील कामगार महिलांनी मारहाण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही पोलिसांनी जबर मारहाण केली.

मारहाण

या मारहाणीत चार महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झालेले असून त्यांनी नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेऊन आल्यानंतर नेवासा पोलिसांकडे धाव घेत नगरच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. महिलांना मारहाण झाल्यामुळे त्याची तक्रार राज्य महिला आयोगात दाखल केली जाणार असून संबंधित गुन्हे शाखेच्या पाच पोलिसांना तात्काळ निलंबित न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची हॉटेल चालकासह गावकऱ्यांनी ही माहिती दिली.

मारहाण

गुन्हे शाखेच्या पोलिसांची दादागिरी वाढली

या भेंडा (ता. नेवासा) येथे असलेल्या हॉटेल अमित’वर धाड घालून पोलीसांनी हॉटेल चालकासह महिलांना मारहाण केलेली आहे. तसा अहवालही जिल्हा रुग्णालयात असून त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या घटनेची चौकशी करुन संबंधित गुन्हे शाखेच्या पाच पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पोलिसांच्या ‘दादागिरी’चा आवाजही विधानसभेत घुमणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अन् गुन्हे शाखेचे पित्त खवळले…

नेवासा पोलीस ठाण्याचा कारभार परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी हाती घेतल्यानंतर अवैध धंदे बंद झाले आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेच्या हाती काहीच लागत नसल्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पित्त चांगलेच खवळले आहे. त्यामुळे कायदा हातात घेऊन महिलांनाही मारहाण केली असल्यामुळे हे प्रकरण राज्य महिला आयोगाच्या दरबारात जाणार आहे.

मारहाण
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *