ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
दिघी सोसायटी

नेवासा : तालुक्यातील दिघी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सध्या चर्चेत आली आहे. थकबाकीदार असूनही निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे सोसायटीचे चेअरमन सोपान अंबादास नागवडे यांच्यासह शोभा सुनील निकम, दत्तात्रय रामराव दळवी आणि मच्छिंद्र रावसाहेब गवळी या चार संचालकांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.

हा निर्णय सहाय्यक निबंधक अधिकारी घोडेचोर यांनी दिला असून, त्यामुळे सोसायटीच्या कारभारात मोठा दिघी सोसायटीचे चेअरमन व तीन संचालक पाच वर्षांसाठी अपात्रबदल होण्याची शक्यता आहे.

दिघी सोसायटी

या प्रकरणाची सुरुवात १७ फेब्रुवारी २०२५ रोजी झाली, जेव्हा देविदास नागोडे यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले की, सोपान नागवडे, शोभा निकम, दत्तात्रय दळवी व मच्छिंद्र गवळी हे संचालक ३० जून २०२४ अखेरपर्यंत थकबाकीदार होते.

महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार, थकबाकीदार व्यक्तीला निवडणुकीत उमेदवारी सादर करण्यास अथवा मतदान करण्यास अपात्र ठरवले जाते. तथापि, वरील व्यक्तींनी २५ मार्च २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीत भाग घेतला होता. त्या निवडणुकीतणुकीत सोपान नागवडे हे चेअरमनपदी निवडून आले. निवडणुकीच्या दिवशीच संपत ब्राह्मणे, शिवाजी निकम् व इतर संचालकांनी यावर आक्षेप घेत सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी अर्ज दाखल केला होता.

सहाय्यक निबंधक कार्यालयाने सर्व तक्रारींची दखल घेत १३ मे रोजी सुनावणी पूर्ण केली.

दिघी सोसायटी

परंतु संचालकांचे जवाब ऐकून व आवश्यक दस्तऐवजांची तपासणी करून, १५ मे रोजी निर्णय दिला गेला. त्यामध्ये वरील चार संचालकांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले.

दिघी सोसायटीमध्ये एकूण १३ संचालक आहेत. यामधून चार संचालक अपात्र ठरल्याने सोसायटीच्या कारभारात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय आणि सहकारी वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली असून, पुढील घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दिघी सोसायटी
दिघी सोसायटी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दिघी सोसायटी
दिघी सोसायटी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दिघी सोसायटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *