ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
बस

नेवासा – महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या नेवासे आगारात पाच नव्या बस दाखल झाल्या. त्याचे सेवार्पण आ. विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. लंघे यांनी नेवासे बसआगाराला अजून १५ नवीन बस व कर्मचारी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, पाच नवीन बसचे लोकार्पण झाल्यानंतर नेवासे-पंढरपूर ही अनेक दिवसांची भाविकांची मागणी असलेली बस स्वतः आमदार विठ्ठलराव लंबे यांनी सुमारे २० फूट चालवून तिचे उ‌द्घाटन केले.
यावेळी बसमध्ये प्रभाकर शिंदे यांच्यासह शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते बसलेले होते. आमदारांच्या यशस्वी टेस्ट राईद्धनंतर उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.

बस

आ. लंघे म्हणाले, की गोरगरिबांसाठी लाल परी ही एकमेव दळणवळणाचे साधन आहे. जास्त गाड्या मिळण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करू शिवाय नेवासा मतदारसंघात अनेक प्रलंबित कामे पूर्ण करायची आहेत, त्यासाठी सर्वांनी आवश्यक त्या सूचना कराव्यात, नेवासे तालुक्यासाठी पाच हजार घरकुले मंजूर आहे. पुढील घरकुलांसाठी कोणी राहिले असल्यास अर्ज करण्याचे आवाहन

लंघे यांनी केले. यावेळी पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे, अंकुश काळे, ज्ञानेश्वर पेचे, राजेंद्र मते, प्रताप चिंधे, मनोज पारखे, निरंजन डहाळे, भाऊसाहेब बाप, आदिनाथ पटारे, आदिनाथ डॉ. करणसिंग घुले, अशोक कर्डक आदी उपस्थित होते. एसटी डेपो मैनेजर प्रशांत होले यांनी स्वागत केले. प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अनिल ताके यांनी प्रास्ताविक केले. देवगड-पंढरपूर ही बस पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. वासुदेव आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले.

बस
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बस
बस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *