ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पोलीस पाटील

नेवासा फाटा | चंद्रकांत दरंदले : गाव कामगार पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य यांची प्रथम राज्यस्तरीय आढावा बैठक राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील दत्त संस्थानात ही बैठक पार पडली.

महाराष्ट्र राज्यातून एकूण २१ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व त्यांच्याबरोबर त्यांच्या जिल्ह्यातील प्रतिनिधी सदर आढावा बैठकीस उपस्थित होते. या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना राज्यअध्यक्ष श्री.कोलते पाटील म्हणाले की, ही बैठक केवळ आढावा बैठक न राहता, संघटनेच्या कार्याची दिशा निश्चित करणारी, पारदर्शकतेची हमी देणारी आणि सर्व जिल्ह्यांना एका सूत्रात बांधणारी व ऐतिहासिक घडामोड होणारी राहील. संघटना बळकट व्हावी, पाटील बांधवांना न्याय मिळावा, आणि गावपातळीवर विकास व कायदा-सुव्यवस्थेचे बळ वाढावे हाच या बैठकीचा खरा उद्देश होता आणि आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पोलीस पाटील

या आढावा बैठकीत राज्य पदाधिकार्‍यांना सनद देण्यात आली. याप्रसंगी गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी मेंबर व सर्व पदाधिकारी तसेच सर्व जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे प्रथम राज्य अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळालेले शहापूर (ता.नेवासा) येथील पोलीस पाटील व श्री. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव कोलते पाटील, तसेच महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना स्थापन करण्यात सिंहाचा वाटा असणारे नेवासा तालुक्यातील निंभारी गावचे पोलीस पाटील संतोष पाटील पवार, मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माळेवाडी खालसा पोलीस पाटील बाळासाहेब पाटील, आहील्यानगर जिल्ह्याचे सचिव आदेश साठे पाटील, सुभाष भांगे पाटील,

पोलीस पाटील

संदीप लहारे पाटील, महेंद्र बिडगर पाटील, चंद्रकांत उंदरे पाटील, गणेश सोमुसे पाटील, बाळासाहेब साळुंके पाटील, शिवाजी घोडेचोर पाटील, एकनाथ कोतकर पाटील, आप्पासाहेब गर्जे पाटिल, प्रल्हाद विधाटे पाटील, ताराचंद बनकर पाटील, बाबासाहेब कानडे पाटील, सखाराम शिंदे पाटील, संजय तुपे, मिनाक्षी रिंधे पाटील, स्वाती घोरपडे पाटील, मंगल सावंत पाटील, ॲड.स्मिता लवांडे पाटील, ॲड.अंजली काळे पाटील तसेच नेवासा तालुक्यासह आहील्यानगर जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.

पोलीस पाटील

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस पाटील
पोलीस पाटील

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *