ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
उदयन गडाख


अर्जुन दराडे यांचा श्री शनिश्वर विद्यालयात सेवापूर्ती समारंभ संपन्न.

सोनई – श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च, माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक
अर्जुन शंकर दराडे यांचा सेवापूर्ती
समारंभ शनी दि 28 जुन 2025 रोजी उदयन गडाख
उपाध्यक्ष मुळा एज्युकेशन सोसायटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना उदयन गडाख म्हणाले की
समर्पित भावनेने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून
अर्जुन दराडे यांनी ज्ञानदानाचे काम केले व अनेक विद्यार्थी घडवले.
विद्यालयाच्या व संस्थेच्या
अनेक उपक्रमात त्यांनी आत्मीयतेने
सहभागी होऊन काम केले.

उदयन गडाख


अर्जुन दराडे हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते
त्यांच्या कार्याचा संस्थेला अभिमान आहे असे म्हणाले.
पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुळा एज्युकेशन सोसायटीत शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली
यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करू शकलो.
मुळा एज्युकेशन सोसायटी विषयी
कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यालय व संस्थेच्या वतीने उदयन गडाख यांच्या हस्ते अर्जुन दराडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे,ह भ प आदीनाथ महाराज आंधळे,मदनराव डोळे,रामकीसन दराडे,प्राचार्य अनिल पिसाळ,प्राचार्य इंदुमती खंडागळे,प्राचार्य भीमराज खोसे,प्राचार्य दिलीप सोनवणे,मुख्याध्यापिका यमुना इखे,मुख्याध्यापक संजय लोंढे,पर्यवेक्षक व्यंकटेश बेल्हेकर, आदीसह शिक्षक ,विद्यार्थी व वंजारवाडी ग्रामस्थ ,सोनई ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन विद्या दरंदले यांनी केले तर आभार जालिंदर शेटे यांनी मानले.

उदयन गडाख
उदयन गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उदयन गडाख
उदयन गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उदयन गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *