नेवासा – भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह क्सिऑम ४ मोहिमेतील चार अंतराळवीरांनी सोमवारी – आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक वास्तव्यानंतर पृथ्वीवरील परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे शुक्ला यांनी मिशन पायलट म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्यासोबत कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोश उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे तिबोर कपु हे मिशन विशेषज्ञ होते. या प्रवासाचे थेट प्रक्षेपण नासानं केलं, ज्यामुळं अंतराळ संशोधनातील भारताचं योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

क्सिऑम ४ मोहिमेतील अंतराळवीर शुभांशु शुक्ला, पेगी व्हिटसन, स्लावोश उझनान्स्की-विस्निव्स्की आणि
तिबोर कपु यांनी सोमवारी दुपारी २:३७ वाजता ड्रॅगन ग्रेस अंतराळयानाचं हेंच बंद केलं. त्यानंतर त्यांनी पृथ्वीवरील २२.५ तासांच्या प्रवासासाठी अंतिम तपासणी केली. अंतराळ स्थानकापासून यान वेगळं होण्याची प्रक्रिया दुपारी ४:३५ वाजता सुरू झाली. ही प्रक्रिया पूर्णपणे स्वायत्त असून, यान अंतराळ स्थानकापासून सुरक्षित अंतरावर नेण्यासाठी अनेक इंजिन बर्न्स केले जाणार आहेत. यानाचं ट्रंक वेगळं करून वातावरणात प्रवेशापूर्वी हीट शील्ड योग्य दिशेनं ठेवण्याची तयारी केली जाईल. क्सिऑम ४ मोहिमेची सुरुवात २५ जून २०१५ रोजी झाली, जेव्हा फाल्कन-९ रॉकेटनं फ्लोरिडाहून ड्रॅगन अंतराळयानासह उड्डाण केलं होतं. या मोहिमेनं भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्यासह आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधनात भारताचं स्थान अधिक दृढ केलंय. १८ दिवसांच्या या मोहिमेत अंतराळवीरांनी विविध वैज्ञानिक प्रयोग केले आणि अंतराळ स्थानकावर महत्त्वपूर्ण कार्य केलं. शुक्ला यांनी मिशन पायलट म्हणून यानाच्या नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावली, तर कमांडर पेगी व्हिटसन यांनी मोहिमेचं नेतृत्व केलं. पोलंड आणि हंगेरीच्या अंतराळवीरांनीही आपापल्या तांत्रिक कौशल्यांचा वापर करून मोहिमेच्या यशात योगदान दिलं.

या मोहिमेचे थेट प्रक्षेपण नासानं केलंय, ज्यामुळ जगभरातील प्रेक्षकांना अंतराळवीरांचा परतीचा प्रवास आणि तांत्रिक प्रक्रिया पाहण्याची संधी मिळाली. ड्रॅगन ग्रेस यानाची रचना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून, स्वायत्त जलावतरण आणि पुनर्प्राप्ती प्रक्रिया ही अंतराळ संशोधनातील प्रगती दर्शवते. या मोहिमेमुळं भारताच्या अंतराळ संशोधनातील सहभागाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.
कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरणार
वातावरणात प्रवेश करताना यानाला सुमारे १,६०० डिग्री सेल्सियस तापमानाला सामोरे जावं लागेल. पृथ्वीच्या दिशेनं परत येताना पॅराशूट्स दोन टप्प्यांत उघडले जातील. पहिल्या टप्प्यात ५.७ किमी उंचीवर स्थिरीकरण पॅराशूट्स उघडतील, तर दुसऱ्या टप्प्यात २ किमी उंचीवर मुख्य पॅराशूट्स उघडतील. यानाचे जलावतरण मंगळवारी (१५ जुलै २०२५) दुपारी ३:०१ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर होईल.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.