ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पुरस्कार

डॉ ओमप्रकाश अट्टल,स्व भाऊसाहेब लालजी दरंदले,स्व मोहनराव येळवंडे,स्व गोरक्षनाथ जगताप यांचा समावेश.

सोनई – सोनई परिसरासह नेवासा तालुक्यात व अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक,शैक्षणिक, संस्कृतीक ,क्रीडा ,धार्मिक, आरोग्य, ग्रामविकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई यांच्या वतीने सन 2002 पासून सोनई व परिसराच्या विकासात विविध माध्यमातून कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांना नवरात्र महोत्सवात सोनईरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते. मा खा यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेने व माजी मंत्री शंकरराव गडाख व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 चे सोनईरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सोनई परिसरात तब्बल 50 वर्षांपासून आरोग्यसेवेसाठी स्वतःला वाहून घेणारे डॉ ओमप्रकाश रामदयाल अट्टल यांना जाहीर करण्यात आला तसेच
सोनई परिसरासाठी योगदान देणाऱ्या व सध्या हयात नसलेल्या व्यक्तींना मरणोत्तर यावर्षीपासून प्रथमच मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतुन सोनईरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार


यामध्ये स्व भाऊसाहेब लालजी दरंदले मा व्हा चेअरमन मुळा सहकारी साखर कारखाना सोनई ,स्व मोहनराव हनुमंता येळवंडे माजी संचालक मुळा सह ,साखर कारखाना सोनई, नवनाथनगर,स्व गोरक्षनाथ केरु जगताप मा उपसरपंच सोनई यांना जाहीर करण्यात आला असून पुरस्कार निवडीचे पत्र यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या घरी पुरस्कार निमंत्रणाचे पत्र प्रतिष्ठानच्या सदस्यासह पोहोच केले बुध दि 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता
महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे तरी याप्रसंगी सोनई व परिसरातील, नेवासा तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केले आहे…

पुरस्कार
पुरस्कार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुरस्कार
पुरस्कार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *