घोडेगाव – नेवासा तालुक्यातील चांदा येथे गावठी कट्यातुन गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. ११ रोजी शाहीद शेख यांच्या चांदा येथील सहा नंबर चारीवरील घरी रविवार असल्याने कंदुरीचा कार्यक्रम होता. त्यामध्ये शेख यांचे मित्र मंडळी देखील त्या कार्यक्रमासाठी आलेले होते.

अचानक अज्ञात व्यक्तींनी गावठी कट्यातुन शाहीद राजु शेख (वय.२५) याच्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन गोळ्या झाडल्या त्यामध्ये शेख जागीच मयत झाला.. घटनेची माहिती कळताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी, पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे तसेच शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू, अहील्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.

सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या गोळीबारा मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लवकरच या गुन्ह्याची उकल करून आरोपीस पकडण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

