
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे सामायिक बांधावरुन झालेल्या मारहाणीत एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. ९ रोजी फिर्यादी सचिन रघुनाथ मुटके (वय.२६) रा. महालक्ष्मी हिवरे हे शेताच्या बांधावरुन मोटार चालू करण्यासाठी जात असताना आरोपी यांनी तु आमच्या बांधावरुन कसा काय जातो, असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करून लोखंडी पाइपने व लाथाबुक्यांनी मारहाण करत तुला ट्रॅक्टर खाली घालून मारु अशी धमकी दिली.

असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार आरोपी अक्षय श्रीकांत पालवे, लता श्रीकांत पालवे, मनीषा अक्षय पालवे, सर्व राहणार महालक्ष्मी हिवरे यांच्या विरोधात गुन्हा र. नं. ९/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३), प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा तमनर हे करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

