आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मोहिनीराज

नेवासा येथील श्री. मोहिनीराज देवस्थानात आज शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६, माघ शुद्ध पंचमी (वसंत पंचमी) या शुभ मुहूर्तावर नव्याने बांधण्यात आलेल्या व्यासपीठाचे पूजन व लोकार्पण समारंभ उत्साहात पार पडला.ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे ह.भ.प. श्री. देविदास महाराज म्हस्के, नेवासा शहराचे प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले व सौ. घुले यांच्या हस्ते विधिवत पूजन करून व्यासपीठाचे लोकार्पण करण्यात आले.

मोहिनीराज

कलाकुसरीतून साकारलेले श्रद्धेचे व्यासपीठ नेवासा येथील श्री. मोहिनीराज देवस्थानात उभारण्यात आलेले नूतन व्यासपीठ हे केवळ दगडी बांधकाम न राहता, भक्ती व कलाकौशल्याचा जिवंत संगम ठरले आहे. आठ फूट रुंद चार फूट रुंद व चार फूट उंचीचे दगडी महिरप व व्यासपीठ नांदेड येथील अत्यंत कुशल कारागिरांनी आपल्या कलात्मक हातांनी साकारले असून, त्यावर कोरलेल्या नाजूक व भावपूर्ण डिझाईन मंदिराच्या गाभाऱ्याला वेगळीच शोभा देत आहेत.

शब्दाविना श्रद्धा व्यक्त करणारी ही शिल्पकला पाहताच भक्तांचे मन भारावून जाते. व्यासपीठामुळे श्री. मोहिनीराज मंदिराच्या गाभाऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून आले असून, संपूर्ण देवालय परिसरात दिव्यता व प्रसन्नतेचा अनुभव येतो. परंपरा आणि आधुनिक कलादृष्टी यांचा सुरेख मेळ साधणारे हे व्यासपीठ आज पासून सुरू होत असलेल्या मोहिनीराज यात्रेच्या भागवत कथेत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्रबिंदू ठरणार असल्याची भावना भाविकांतून व्यक्त होत आहे.

मोहिनीराज

या प्रसंगी रामभाऊ जगताप, रविंद्र जोशी, जयंत देवचक्के, डॉ. उदयकुमार बल्लाळ, नगरसेवक स्वप्नील मापारी, निरंजन डहाळे, राजू गुजराथी, महेश मापारी, संजय देशपांडे, प्रमोद देशपांडे, प्रसाद पाठक गुरुप्रसाद देशपांडे, दीपक गोसावी, विष्णुपंत बडवे, शंकरराव बडवे, विश्वनाथ बडवे, अनंत बडवे, नारायण बडवे, भरत बडवे, श्रीपाद बडवे, सुदर्शन बडवे व जयेश बडवे व सर्व पुरोहित बडवे परिवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे पौरोहित्य विष्णुपंत बडवे, नारायण बडवे व अनंत बडवे यांनी केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मोहिनीराज
मोहिनीराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मोहिनीराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!