नेवासा-भगवान श्री विष्णूंचे मोहिनी अवताराचे जगातील एकमेव क्षेत्र असलेल्या नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मोहिनीमाय, मोहिनीमाय, मी अपराधी घ्या पदरात असा जयघोष करत लखलखत्या अग्नीच्या खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक भळंद कार्यक्रम माघ पौर्णिमेला भक्तिमय वातावरणात पार पडला.
१ फेब्रुवारी माघ पोर्णिमेच्या रात्री मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या मंडपात संबळाच्या निनादात आई जगदंबेचा गोंधळ घालत भळंद खेळत देवदेवतांना यात्रा उत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. भळंद कार्यक्रम प्रसंगी चौरंगावर मांडलेल्या देवीच्या मुखवट्यासह गणेशपूजन, पुण्याहवाचन करून जगदंबेला ऋषिकेश भरतं बडवे व स्नेहल ऋषिकेश बडवे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला

यावेळी गोंधळ कलाकार नजीक चिंचोली येथील कवी दिगंबर गोंधळी यांनी संबळाच्या निनादात देवीची भक्ती गीते गायली त्यांना शुभम गोंधळी, राजेंद्र परदेशी, सतीश गायके, सुधीर चव्हाण, दत्तात्रय गव्हाणे, ओंकार कुलकर्णी यांनी उत्कृष्ट साथ दिली. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रेणुकादेवी आश्रमाचे प्रमुख विश्वस्त प्रा. आदिनाथ जोशी व आदितीताई खापराचे भांडे तळहातावर घेऊन या जोशी यांनी लखलखत्या अग्नीचे पारंपरिक उत्सवात भळंद खेळला.भळंद कार्यक्रमानंतर श्री मोहिनीराजांची महाआरती करण्यात आली. ‘बोल मोहिनीराज महाराज की जय’ ‘बोल मोहिनीराज की जय’ असा जयघोष यावेळी करण्यात आला. पौरोहित्य पांडूरंग जोशी, निखिल जोशी, अभिजित बडवे, अनिल बडवे, ओंकार जोशी यांच्यासह बडवे मंडळीनी केले.
श्री मोहिनीराज देवस्थानच्या वतीने अध्यक्ष भालचंद्र बडवे व सचिव जयेश बडवे यांच्या हस्ते गोंधळ कलाकार दिगंबर गोंधळी व आला. उपस्थित भाविकांना रेवडी-शुभम गोंधळी यांचा सन्मान करण्यात मुरमुऱ्याचा प्रसाद वाटण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

