नेवासा –नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेच्या निमित्ताने कुटे पाटील परीवाराच्या वतीने मंदिरावर लावण्यात येणाऱ्या मानाच्या पहिल्या झेंड्याचे पूजन मध्यमेश्वर देवस्थानचे महंत ऋषिनाथजी महाराज व संत तुकाराम महाराज देवस्थानचे अकुश महाराज जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.ऋषिनाथजी महाराज व अंकुश महाराज जगताप यांचे संजय कुटे व छायाताई कुटे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मानाच्या झेंड्याचे विधिवत पूजन महंतांसह नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राजेंद्र कुटे, शेषराव कुटे, डॉ. मोहन कुटे, सत्यवान कुटे, अॅड. संदीप कुटे, अशोक कुटे, अतुल कुटे, तुषार कुटे, संतोष कुटे यांनी आलेल्या मान्यवरांचे परिवाराच्या वतीने स्वागत केले.

नेवासा बुद्रुक ते नेवासा शहर अशी झेंडा मिरवणूक
आली. या काढण्यात मिरवणुकीचे नेवासा बुद्रुक व नेवासा शहरात विविध संघटनेच्यावतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी अॅड. अनिल मारकळी, नितीन मारकळी, विठ्ठलराव बेद्रे, संजय गायकवाड, दिलीप गायकवाड, राजेंद्र थावरे,पिंटू बोरकर, केशव विधाते, सूर्यभान विधाते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामदैवत मोहिनीराजांच्या श्री मंदिर प्रांगणात मानाच्या पहिल्या झेंडा मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी यात्रा कमिटी व देवस्थानच्या वतीने श्रीफळ प्रसाद देऊन झेंडा मानकरी संजय कुटे यांचा सन्मान करण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

