अशोकराव ढगे

नेवासा- श्री संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात प्राध्यापिका सौ संगीता नवले यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार समारंभ ह भ प बन्सी महाराज तांबे सभागृहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तुकाराम जी नवले पाटील होते. उपस्थितांचे स्वागत करून प्रा डॉ संजय घनवट यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी प्रतिपादित केले की समाजात शिक्षणाने परिवर्तनाबरोबर सामाजिक क्रांती सुद्धा विधायक मार्गाने घडत आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संकल्पना बदलत आहे त्याचे अवलोकन प्राध्यापकांनी केले पाहिजे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डाटा प्रोसेसिंग व डिजिटल तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक विषयाचा समावेश शिक्षण क्षेत्रात केला पाहिजे विद्यार्थ्यांना आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास परि पूर्णपणे स्वावलंबी केले पाहिजे असे शेवटी डॉ. ढगे म्हणाले..

अशोकराव ढगे

कार्यक्रमाला उपप्राचार्या राधा मोटे, प्रा. वाळुंज, प्रा. रोडे , घोरपडे, प्राध्यापक वर्ग लिपिक कर्मचारी वृंद माळी कराळे गायकवाड व आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्याप्रसंगी एडवोकेट वसंतराव नवले व त्यांच्या दोन्ही मुलांनी मनोगत व्यक्त केले तसेच प्राध्यापक वर्गांनी सौ संगीता नवले मॅडम यांच्या कामाचा यथोचित उल्लेख केला. सत्कार समारंभाला सौ नवले मॅडम यांनी आई वडील सासू-सासरे दीर मुले या सर्वांचे उत्तम सहकार्य मिळाल्याचे आवर्जून सांगितले. प्रा माकोने, व जेष्ठ नेते तुकाराम नवले पाटील यांनी विचार मांडले सूत्रसंचालन प्रा खरात यांनी केले तर आभार प्रदर्शन एस एम तोगे यांनी केले उत्कृष्ट फोटोग्राफी अजहर शेख व प्रा ए वाय जाधव यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली

newasa news online
अशोकराव ढगे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अशोकराव ढगे
अशोकराव ढगे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अशोकराव ढगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!