नेवासा | प्रतिनिधीनेवासा तालुक्यातील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत क्रीडा सुविधा न मिळाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.शाळेकडे स्वतःचे खेळाचे मैदान नसून, उपलब्ध मैदान शाळेपासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर असून मध्ये मुख्य रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.या संदर्भात नागरिक कार्तिक भाऊसाहेब पासलकर यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार (क्रमांक Dist/ZPAH/2022/4964) दाखल केली होती.तक्रारीवर शिक्षण विभागामार्फत शाळेकडून खुलासा मागवण्यात आला. मात्र, या खुलाशातूनच शाळेने मैदान नसणे व क्रीडा शिक्षकाचे पद अनेक वर्षांपासून रिक्त असल्याची कबुली दिली आहे.

विशेष म्हणजे, इयत्ता ५वी ते १२वी पर्यंत मोठ्या संख्येने विद्यार्थी असतानाही नियमित क्रीडा शिक्षण दिले जात नसल्याचे समोर आले आहे.शालेय मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या अटींचे उल्लंघन होत असतानाही शाळेची मान्यता कशी सुरू आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.या प्रकरणी तक्रारदाराने शिक्षण उपसंचालक व जिल्हा प्रशासनाकडे तातडीची चौकशी, शाळेची प्रत्यक्ष तपासणी, क्रीडा शिक्षक नियुक्ती व योग्य मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.तसेच, वेळेत कारवाई न झाल्यास RTI, कायदेशीर मार्ग व लोकशाही आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का? असा सवाल पालक व नागरिकांतून उपस्थित होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

