महापारेषण
महापारेषण

नेवासा – महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची महापारेषण ही एक शासकीय अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. या महापारेषण कंपनीची अधिकारी व कर्मचारी यांची एकूण संख्या सुमारे पंधरा हजार आहे. या महापारेषण कंपनीचा महावितरण कंपनी सारखा लोकांशी थेट संबंध येत नाही.असे असले तरी महाराष्ट्र राज्य लोकसेवेच्या माध्यमातून सर्वप्रथम उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या श्रीमती सुचिता भिकाने यांनी प्रचंड सामाजिक योगदान असलेल्या महापुरुषांच्या अतुलनीय कामाची माहिती सर्व कर्मचारी वर्गाला होत राहावी आणि त्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी, यासाठी उपक्रम राबविण्याचे धोरण निश्चित केले.
एप्रिल 2025 पासून मानव संसाधन विभागाच्या कार्यकारी संचालक या नात्याने अतिरिक्त अपर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्या धडाडीच्या स्वभावामुळे आत्तापर्यंत अनेक रेंगाळलेली कामे पूर्णत्वास गेली आहे.

महापारेषण

दैनंदिन कामे करताना विद्युत विभागातील व तसेच अन्य विभागातील सुद्धा कर्मचारी अधिकारी वर्गाला दिनविशेष याची माहिती मिळणे. हे गरजेचे असल्याचे श्रीमती सुचिता भिकाने यांना वाटले. आपण दैनंदिन कामे करत राहतो.परंतु ही कामे करत असताना अनेक महापुरुषांचे जयंती व पुण्यतिथी वा देशातील समाजातील घडलेल्या विविध घटना याकडे सुद्धा आपले लक्ष वेधले पाहिजे. सर्वांगीण माहिती प्राप्त करून व्यक्तिमत्व विकासासाठी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. महापुरुषांनी जो काही प्रचंड संघर्ष आणि अतुलनीय त्याग करून आपले संपूर्ण जीवन पणाला लावून सर्वसामान्यांचे आयुष्य सुकर व्हावे. यासाठी त्यांच्या योगदानाचे स्मरण अत्यंत महत्वाचे आहे.यासाठी श्रीमती सुचिता भिकाने यांनी महापारेषणच्या फेसबुक पेजवर आपल्या कामाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी यांचे संदेश देताना आवर्जून त्यासोबत त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य याची माहिती देण्याचे धोरण राबविलेले आहे.

महापारेषण

महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कुमार यांचे या उपक्रमास मार्गदर्शन लाभले. यामुळे आपत्कालीन व दैनंदिन विद्युत कामे करताना सुद्धा कर्मचारी वर्ग जेव्हा फावल्या वेळेमध्ये मोबाईलवर व्यस्त असतो.तेव्हा आपसूकच त्यांना त्या दिवशी इतिहासात घडून गेलेल्या महापुरुषांच्या जीवन कार्याविषयी माहिती भेटते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच कर्मचारी अधिकारी वर्गांकडून स्वागत होत आहे. तसेच महापारेषण कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांची मुले स्पर्धात्मक परीक्षाची तयारी करत आहे. ते सुद्धा रोजच महापारेषण च्या फेसबुक पेजला माहिती मिळवण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत.मानव संसाधन विभागाचे दैनंदिन कामे पार पाडत असताना इतिहासातील महान व्यक्तींनी जे योगदान दिले आहे त्याबाबत कर्मचारी वर्गास माहिती करून दिल्यास त्यांच्या ज्ञानात भर पडते व त्यांना आपसूकच प्रेरणा भेटते.महापारेषण कंपनीचे इतर अपडेट मिळावे म्हणून महापारेषणच्या फेसबुक पेजला सर्वांनी फॉलो करावे असे आवाहन मानव संसाधनचे मुख्य महाव्यवस्थापक श्री राजू गायकवाड यांनी करताना कर्मचारी वर्गाने त्यांच्या अजून काही मौलिक सूचना असल्यास जरूर कळवाव्यात असे सांगून प्रशासन व कर्मचारी असा दुहेरी सुसंवाद वाढीसाठी आम्ही सतत नूतन उपक्रम राबविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे अधोरेखित केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महापारेषण
महापारेषण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महापारेषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!