आर टी ओ
आर टी ओ

नेवासा – रोजच्या दैनंदिन जीवनात आरटीओ विभागाची गाडी दिसली तर अनेक वाहनचालकांची दंडाच्या भीती पोटी भंबेरी उडते मात्र एका अपघाताच्या घटनेत आरटीओ अधिकाऱ्यांचे माणुसकीचे दर्शन नागरिकांना बघायला मिळाले याबाबत सविस्तर बातमी अशी की,संगमनेर येथे मेडिकल मध्ये काम करणारासागर गंगावणे हा दुचाकी स्वार संभाजीनगर येथून
संगमनेर येथे जात असताना साईनाथनगर येथे दुपारी.१ वाजेच्या सुमारास श्रीरामपूर कडून नेवाश्याकडे येणाऱ्या इनोव्हा गाडीची व दुचाकीची समोरा समोर धडक झाली.

आर टी ओ

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला त्यावेळी बघ्यांची मोठी गर्दी अपघात स्थळी जमली त्यांनी मदातबकरणे अपेक्षित असताना काही जण या अपघाताचे फोटो, व्हिडीओ घेण्यात गुंग होते मात्र त्याच वेळी श्रीरामपूर वरून नेवाश्याकडे येणाऱ्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सचिन सानप यांना हा अपघात दिसला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णवाहिकेची वाट न बघता त्यांच्या सरकारी वाहनातून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले अचानक आरटीओचे वाहन वेगात दवाखान्यात घुसल्याने कर्मचारी व नागरिक गडबडून गेले मात्र त्या युवकाला जेव्हा स्वतः आरटीओ सानप व त्यांच्या पथकाने उचलून दवाखान्यात दाखल केल्यावर तेथील अनेक नागरीकांना सरकारी वर्दीतील अधिकाऱ्याचे माणुसकीचे दर्शन घडले.

आर टी ओ

या पथकातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक निकिता पानसरे आरटीओ वाहन चालक बद्रीनाथ कोकाटे व जागरूक नागरिक चंद्रकांत गायकवाड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आर टी ओ
आर टी ओ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आर टी ओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!